प्रत्येकाचं भिजणं वेगळं…..

पाऊस दाटलेला... पाऊस नुसता शब्द उच्चारला तरी आपल्याला आभाळागत भरुन आल्यासारखं वाटतं. अगदी चिंब झाल्याचा भास होतो. पण प्रत्येकाचं हे भरून येणं किंवा चिंब होणं सारखं नसतं. कारण, ज्याचा-त्याचा, अगदी प्रत्येकाचा मनातला पाऊस हा वेगळा. आणि म्हणूनच त्यात भिजणं वेगळालं असतं. प्रत्येकाची अनुभूती वेगळी, आसक्ती वेगळी आणि आवेगही वेगळाच. कुणाचा पाऊस झिमझिमणारा तर कुणासाठी ती रिमझिम. कुठे थेंब-थेंब तर कुठे धो-धो वाहत नेणारा. कुणाचा मोरपिसारा फुलवून थुई-थुई नाचणारा. कुणासाठी चिंब भिजवत मनात खोलवर प्रेम रुजवणारा. तर हाच पाऊस कुणासाठी वादळ-वाऱ्यासह अगदी सर्वस्व उध्वस्त करणारा. किती ही याची अगणित रुपं आणि तितकाच लहरी त्याचा स्वभाव. त्याच्या या लहरी स्वभावाला लक्षात घेऊनच व.पु.काळे नी प्रत्येकाच्या भिजण्याचं वर्णन काहीसं असं केलं आहे. "…
Read More